Ad will apear here
Next
नगर जिल्ह्यातली पहिली ग्लोबल क्लासरूम सुरु
शिर्डी/पुणे : ‘सातशे कोटी लोकसंख्या असलेल्या दुनियेत माणसाला माणसाकडून माणूस बनण्यासाठीच शिकायचे आहे. त्यासाठी जगभरातील माणसांचा एकमेकांशी सुसंवाद होणे गरजेचे आहे,’ असे प्रतिपादन पुण्यातील संगणकतज्ञ संतोष तळघट्टी व्यक्त केले.

शिर्डी येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत सुरू  करण्यात आलेल्या ग्लोबल क्लासरूमच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. नगर जिल्ह्यातील ही पहिली ग्लोबल क्लासरूम असून यामुळे या शाळेचे विद्यार्थी जगाशी मुक्तसंवाद साधू शकणार आहेत.

या प्रसंगी शाळा विकास समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. जे. के. गोंदकर, केंद्रप्रमुख सौ. दातीर, विस्तार अधिकारी श्री. गौते, नगरसेवक सुजित गोंदकर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आरिफ कादरी, मुख्याध्यापक शैलजा वाघमारे, उपमुख्याध्यापक श्री. बैलम आदी उपस्थित होते.

संतोष तळघट्टी म्हणाले, ‘कोणतीही गोष्ट शिकताना ती तात्काळ अवगत होत नाही. त्यासाठी मोठा प्रयत्न करावा लागतो. संगणकाची क्रांती जगभरात झाल्याने दुरदुरच्या गोष्टी आपणास सहज उपलब्ध होऊ लागल्या. ग्लोबल क्लासरूममध्ये विद्यार्थ्यांना जगातील विविध वस्तू, विषय, माणसे तसेच नैसर्गिक गोष्टींचा अभ्यास करायला मिळणार आहे. ई-लर्निग मिडीया नेटवर्क ऑफ प्रोफेशनल्स या संस्थेमार्फत देशात दहा हजार ग्लोबल कार्यशाळा घेण्यात येत आहे. नगर जिल्ह्यातील ही पहिली ग्लोबल कार्यशाळा साईबाबांच्या आशीर्वादाने शिर्डी येथे सुरू केली आहे.’

तळघट्टी पुढे म्हणाले, ‘सहा महिन्यांपूर्वी शिर्डीला आलो होतो. त्यावेळी या शाळेला भेट दिली होती. वीजबिल थकल्याने येथे वीज नव्हती. तसेच संगणक कक्ष अनेक दिवसांपासून बंद होता. ही परिस्थिती पाहिल्यानंतर हळूहळू स्थानिकांच्या आणि शिक्षकांच्या मदतीने येथे काम सुरू केले. साईबाबांच्या आशीर्वादाने आज ही शाळा जिल्ह्यातील पहिली स्मार्ट शाळा झाली आहे. सर्व संगणक अद्ययावत झाले आहेत. विद्यार्थ्यांना आता जगाशी संपर्क साधता येईल, याचा फार आनंद वाटतो आहे.’

केंद्रप्रमुख दातीर म्हणाल्या, ‘शिर्डीतील शाळा जिल्ह्यातील पहिल्या नंबरची शाळा असून या शाळेची स्थापना १८८१ साली साईबाबांच्या हयातीत झाली आहे. या शाळेत ५७ खोल्या आहेत. एकूण पटावरची संख्या ८०२ असून २६ शिक्षक आहे. ग्लोबल क्लासरूमसाठी या शाळेची पहिली निवड होत असल्याने मनस्वी आनंद झाला आहे.’

या वेळी मुलांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सिमेवरील जवान, क्रिकेटपटू सचिन तेंडूलकर यांच्यांशी संवाद साधण्याची इच्छा व्यक्त केली. ऑनलाईन बोलण्याची प्रात्याक्षिके करण्यात आली. त्यामध्ये जर्मनीतील श्रीमती आना यांच्याशी थेट विद्यार्थ्यांनी ऑनलाईन संवाद साधला.

प्रास्ताविक श्री. वाघमारे यांनी केले. आभार श्री. अहिरे यांनी मानले.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/WZQCBG
Similar Posts
साईबाबा संस्थानच्या अध्यक्षांना राज्यमंत्रीपदाचा दर्जा शिर्डी : राज्य सरकारच्या विधी व न्याय विभागाने नुकत्याच जारी केलेल्या शासन निर्णयानुसार साईबाबा संस्थानचे अध्यक्ष सुरेश हावरे यांनी राज्यमंत्रीपदाचा दर्जा प्रदान करण्यात आला आहे. त्यामुळे त्यांना शासकीय समारंभात मानाचे स्थान, समितीच्या मुख्यालयात कार्यालय, दौऱ्यावर असताना शासकीय वाहन व निवास व्यवस्था, मासिक मानधन व विविध भत्ते मिळतील
नरवीर तानाजी तरुण मंडळातर्फे भव्य देखावा पुणे : नरवीर तानाजी वाडी येथील नरवीर तानाजी तरुण मंडळातर्फे शिर्डी येथील साईबाबा यांच्या मंदिराच्या प्रतिकृतीचा देखावा २५०० फूट जागेत साकारण्यात आला होता. दिव्य स्वरूपात उभारलेल्या या देखाव्यातून भाविकांना प्रत्यक्ष साईबाबांचे दर्शन घेण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे.
शिर्डी येथे गुरुपौर्णिमा उत्सवाची सांगता शिर्डी : येथील श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था, यांच्या वतीने २६ जुलैपासून सुरू असलेल्‍या गुरुपौर्णिमा उत्‍सवाची सांगता हभप चारुदत्‍त आफळे यांच्‍या काल्याच्या कीर्तनाने झाली.
सीएम चषकच्या अंतिम सामन्यांना सुरुवात मुंबई : महाराष्ट्राची आतापर्यंतची सर्वांत मोठी क्रीडा आणि सांस्कृतिक स्पर्धा असलेल्या सीएम चषकचे राज्यस्तरीय अंतिम सामने मुंबई, अहमदनगर आणि पुण्यात पार पडतील. राज्यातील सर्व जिल्ह्यांतून एकूण ४५ लाखांहून अधिक स्पर्धकांनी सीएम चषकच्या विविध स्पर्धांमध्ये सहभाग घेतला. भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष,

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language